shettale anudan yojana: वैयक्तिक शेततळ्यासाठी अनुदान योजना पहा येथे करा अर्ज

shettale anudan yojana: वैयक्तिक शेततळ्यासाठी मित्रांनो मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत (shettale anudan yojana) वैयक्तिक शेततळे (farm pond) या बाबीचा समावेश करण्यात आला आहे. बारामती कृषी उपविभागातील इच्छुक शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्यासाठी (agriculture irrigation scheme) महा-डीबीटी या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन उप विभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे. या योजने करिता स्थानिक पातळीवर आपण अर्ज सादर करु शकता. अर्ज करण्यासाठी खालील वेबसाईट लिंकवर पहा.

अर्ज करण्यासाठी पहा, यावर क्लिक करा

वैयक्तिक शेततळे अनुदान या योजनेंतर्गत पुणे जिल्ह्याचा आढावा पाहिला तर बारामती तालुक्यात ७३.६० लाख, दौंड येथील ३८.२३ लाख, इंदापूर येथे ६५.८५ लाख व पुरंदर येथे ८६.५६ लाख असे एकूण २६४.२४ लाख लक्षांक प्राप्त झाले आहेत. शेततळे अनुदानाच्या रकमेत ५० टक्के वाढ करण्यात आली असून शेतकऱ्यांना ७५ हजार रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे इतरत्र सर्व जिल्ह्यातील शेतकरी वैयक्तिक शेततळे योजनेचा लाभ घेऊ शकतात. mahadbt login

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान ०.६० हेक्टर क्षेत्र असावे. शेततळ्याची जमीन तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी. अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी शेततळ्याच्या कोणत्याही योजनेतून लाभ घेतलेला नसावा. अशाच शेतकऱ्यांना यामध्ये सहभाग घेता येऊ शकतो.

योजनेत ५ टक्के दिव्यांग लाभार्थी असतील, तर उर्वरित पैकी ७० टक्के पुरुष व ३० टक्के महिला या प्रमाणात लाभ देण्यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे. mahadbt login

अर्ज करण्यासाठी पहा, यावर क्लिक करा

Leave a Comment