राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व इतर यंत्र खरेदीसाठी 40% पासून 60% पर्यंत अनुदान दिलं जातं.
राष्ट्रीय कृषी विकास योजना (RKVY) : राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत विहीर, कांदाचाळ इतर शेतीपूरक कामासाठी शेतकऱ्यांना 40 ते 60 टक्यापर्यंत अनुदान दिलं जातं.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात बी-बियाणे, खते इत्यादीच्या खरेदीसाठी 50 टक्के अनुदान दिलं जात. प्रथमता: शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड केली जाते, त्यानंतर कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्यामार्फत बियाणे खरेदी करण्याचा परवाना दिला जातो.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान : या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना कांदाचाळ, पॅकहाऊस, शेडनेट हाऊस, शेततळे अस्तरीकरण इत्यादी विविध कामासाठी 50 टक्के पर्यंत अनुदान दिलं जात.
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना : फळबाग लागवडीसाठी प्रसिद्ध असलेली महाराष्ट्रातील एकमेव योजना म्हणजे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतामध्ये विविध फळबाग लागवडीसाठी जशाप्रकारे संत्री, मोसंबी, आंबा, चिंच, जांब, डाळिंब इत्यादीसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात येत.