महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. राज्यातील कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे आता महिलांना डिसेंबर महिन्यापासून पैसे देण्यास पुन्हा सुरुवात केली जाणार आहे. (Ladki Bahin Yojana News)
महायुती सरकारने लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याची ग्वाही दिली आहे. याची अंबलबजावणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यानंतर होणार आहे. म्हणजेच महिलांना २१ एप्रिलपासून २१०० रुपये मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात सरकारने १ जुलैपासून दर महिन्याला लाडक्या बहिणींना १५०० रुपये दिले आहे. त्यानंतर सरकार पुन्हा आल्यावर महिलांना २१०० रुपये देणार असल्याचे वचन दिले होते. त्यामुळे आता बहिणींना २१०० रुपये देणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केलं आहे. (Women Will Get 2100 Rupees)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना पुढच्या महिन्यापासून मिळू शकतो. आचारसंहिता संपल्यावर महिलांना पैसे मिळणार आहे. परंतु सध्या महिलांना १५०० रुपये मिळणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यावर महिलांना २१०० रुपये दिले जाणार आहे. (Ladki Bahin Yojana News)
Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या.