Magel Tyala Saur Krushi Pump Yojana : मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेंतर्गत पैसे भरण्यासाठी पर्याय आला, पैसे भरावे कि नाही?

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana : मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेंतर्गत पैसे भरण्यासाठी पर्याय आला, पैसे भरावे कि नाही?

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana MTSKPY: सौर ऊर्जेचे महत्त्व लक्षात घेऊन, महाराष्ट्र सरकार 2015 पासून विविध सौर कृषी पंप योजना राबवत आहे. यापूर्वी अटल सौर कृषी जलपंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी जलपंप योजना लागू करण्यात आली आहे. याशिवाय, सध्या प्रधानमंत्री कुसुम पॅकेज – प्लॅन बी अंतर्गत सौर कृषी पंप बसवले जात आहेत. राज्यात 6 सप्टेंबर 2024 पर्यंत 2,63,156 सौर कृषी जलपंप बसवण्यात आले आहेत. सौरऊर्जेचा शेतकऱ्यांना होणारा फायदा आणि सौर कृषी पंपांना शेतकऱ्यांचा मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन राज्य सरकारने सौर कृषी पंप योजना सुरू करण्याची घोषणा केली. (Magel Tyala Saur Krushi Pump Yojana MTSKPY)

त्यामुळे या योजनेंतर्गत गेल्या दोन महिन्यांपासून पोर्टलवर ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात होते, मात्र आता या अर्जांना पेमेंटचा पर्याय देण्यात आला आहे. म्हणून, तुमचे पेमेंट पर्याय उपलब्ध आहेत का ते तुम्ही तपासू शकता.

 

पंपाची क्षमता रक्कम (₹)
3 एचपी 22,971
5 एचपी 32,075
7.5 HP

पेमेंट पर्याय आला का नाही असे पहा?

https://offgridmtsup.mahadiscom.in/AGSolarPumpMTS/PMKusumCons?uiActionName=trackA1FormStatus

पेमेंट ऑप्शन चेक करण्याची पद्धत:

स्टेप ५: पेमेंट केल्यानंतर अर्ज तपासला जाईल आणि Vendor Selection चा पर्याय येईल, आणि त्यानंतर पंपाची स्थापना करण्यात येईल.

स्टेप १: सर्वप्रथम दिलेल्या लिंकवर जा.

स्टेप २: आपल्या अर्ज क्रमांक (एमके आयडी) प्रविष्ट करा आणि सर्च करा.

स्टेप ३: अर्ज तपशील आणि पंप तपशील दिसेल, त्यामध्ये “Proceed to Payment” हा पर्याय दिसेल.

स्टेप ४: “Proceed to Payment” वर क्लिक करा, आणि त्यानंतर “Pay Now” वर क्लिक करून UPI किंवा DEBIT CARD द्वारे पेमेंट करा.

 

महत्त्वाची सुचना: जे शेतकरी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जसे की सात बारा व विहीर/बोअरवेलची नोंद किंवा सामायिक पाण्याचा स्त्रोत असल्याचे प्रमाणपत्र अपलोड केले आहे, त्यांचाच अर्ज परिपूर्ण मानला जातो. अशा शेतकऱ्यांनीच पेमेंट करावे. कारण, पेमेंट केल्यानंतर अर्जाची छाननी होईल, आणि जर त्रुटी आढळल्या तर रक्कम परत मिळवण्यास खूप वेळ लागू शकतो.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

Home

Leave a Comment