Ladki bahin KYC लाडक्या बहिणींना शेवटची संधी.. नाहीतर पैसे होणार बंद

महाराष्ट्र शासनाने मध्यम वर्गातील महिलांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी लाडकी बहीण योजना चालू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून दर महिन्यांना पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर प्रत्येकी 1500 रुपये जमा होतात.. अनेक लोकांनी या योजनेचा गैरफायदा घेत डुबलीकेट (बनावट) आधार कार्ड च्या साह्याने बोगस लाभ घेतले. याची खबरदारी म्हणून शासनाने केवायसी ladki bahin ekyc प्रक्रिया आणली या माध्यमातून अनेक  बोगस लाभार्थी महिलांचे लाभ देखील बंद झाले. परंतु पात्र महिलांनी या योजनेची केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नसल्यामुळे अनेक महिलांना या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. ज्या महिला विविध कारणामुळे केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकत नव्हत्या अशा महिलांना शेवटची संधी म्हणून सरकारने 30 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

चला तर जाणून घेऊया लाडकी बहीण केवायसी प्रक्रिया साठी लागणारे कागदपत्र या योजनेची केवायसी कशी करायची आणि यासाठी लागणारे कागदपत्र  यांची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया..

ladki bahin ekyc लाडकी बहीण केवायसी प्रक्रिया कोठे करायची ?

लाडक्या बहीण योजनेची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील माही सेवा केंद्र किंवा कॉमन सर्विस सेंटर CSC CENTER या ठिकाणी भेट द्यायची आहे. सोबत जाताना आधार कार्ड आणि आधार नंबर ला लिंक असलेला मोबाईल नंबर घेऊन जावे.

लाडक्या बहिणी योजनेची केवायसी करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी.

  1. आधार कार्ड वरील पत्ता आणि नाव हे बरोबर असणे गरजेचे आहे
  2. केवायसी करण्यासाठी आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे.
  3. आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसल्यास आधार सेंटरवर जाऊन आपला मोबाईल नंबर रजिस्टर करून घ्यावा.

 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण निर्णय अंतर्गत राज्यातील सर्व लाभार्थी महिलांना केवायसी करणे बंधनकारक आहे. याची शेवटची मुदत  30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आले असून पात्र महिलांनी ऑनलाइन फॉर्म किंवा अंगणवाडी सेविका मार्फत प्रक्रिया पूर्ण करावी .
   महिलांनी ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलवर किंवा अंगणवाडी सेविकेमार्फत आधार लिंक करून ई-केवायसी पूर्ण करावी, नाहीतर तुमचे हप्ते कायमचे बंद होऊ शकतात..
लाडकी बहीण केवायसी प्रक्रिया (ladki bahin ekyc ):
    1. वेबसाईटला भेट द्या: अधिकृत पोर्टल ladakibahin.maharashtra.gov.in किंवा येथे क्लिक करा 
    2. आधार नंबर भरा : तुमचा आधार नंबर बरोबर भरा. खाली असलेला कॅपच्या कोड जशास तसा प्रविष्ट करा.
    3. आधार नंबर:
       आपला आधार नंबर बरोबर असल्याची खात्री करा.
    4. OTP पडताळणी: आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाका 
    5. पडताळणी: सर्व माहिती बरोबर असल्यास सबमिट करा.
लक्षात घेण्यासारखे मुद्दे :-
  • मुदत: ३० एप्रिल २०२६ पर्यंत केवायसी करणे आवश्यक आहे. 
  • KYC करणे गरजेचे का?: बोगस लाभार्थी काढण्यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य आहे .
  • विवाहित महिलांसाठी आधार कार्डवर पतीची माहिती असणे गरजेचे आहे आणि अविवाहित महिलांसाठी वडिलांची माहिती update गरजेचे आहे. 

प्रत्येक गावातील अंगणवाडी मध्ये अंगणवाडी सेविका ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत करतील.

Leave a Comment