लाडक्या बहिणींना 2100 रुपये नेमके कधी मिळणार? मंत्री आदिती तटकरेंनी थेट सांगितले

मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांना डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारने सांगितल्यानुसार डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व पात्र महिलांना 1500 रुपये मिळतील.

दरम्यान, निवडणुकीआधी महायुतीने आम्ही सत्तेत आल्यास 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. त्यामुळेच डिसेंबर महिन्यात लाडक्या बहिणींना नेमका किती निधी मिळणार, असे विचारले जात होते. याबाबतच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी नेमकी माहिती सांगितली आहे. aditi sunil tatkare

लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्यात नेमके किती रुपये मिळणार?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत लाडकी बहीण योजनेविषयीची सरकारची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पुढच्या वर्षीचा अर्थसंकल्प मांडताना 2100 रुपये देण्यासंदर्भातला विचार सकारात्मक पद्धतीने करण्यात येणार आहे. आचारसंहितेच्या कालावधीमध्ये स्थगित केलेला लाभ होता तो आता वितरित करण्यात येत आहे. त्याची सुरुवात केलेली आहे. नोव्हेंबर महिन्यातील लाभ महिलांना मिळालेला आहे. डिसेंबर महिन्यातील लाभाच्या वितरणाची सुरुवात आता केलेली आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यात सन्मान निधी पोहचलेला असेल, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.

नव्या रजिस्ट्रेशनची सुरुवात कधी होणार?

म्हणजेच नवीन लाभार्थींच्या नोंदणीच्या नोंदणीची प्रक्रिया अनेक ठिकाणी रखडल्याचं दिसतंय. यावरही आदिती तटकरे यांनी यांनी एबीपी माझाला माहिती दिली. “रजिस्ट्रेशनची शेवटची मुदत 15 ऑक्टोबर होती. 15 ऑक्टोबरपर्यंत अडीच कोटी महिलांनी नोंद केलेली आहे. अद्यापपर्यंत पुन्हा रजिस्ट्रेशनला सुरुवात करण्यासंदर्भात कोणताही निर्णय झालेला नाही. सध्यातरी नोंदणी केलेल्या महिला, पात्र महिलांपर्यंत सन्माननिधी पोहोचवण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. ज्या महिलांचे अर्ज मान्य झालेले आहेत. पण आधार सिडिंगमुळे ज्या महिलांना लाभ मिळालेला नाही, त्या महिलांना कसा लाभ मिळेल याकडे सध्या लक्ष केंद्रित केलेले आहे. आता पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन सुरु करण्याचा निर्णय सध्यातरी झालेला नाही,” अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली. aditi sunil tatkare

सरसकट अर्जांची पडताळणी होणार का?

लाभार्थी महिलांचा अंदाजित आकडा आणि रजिस्ट्रेशनची संख्या लक्षात घेऊन रजिस्ट्रेशन चालू करायचे की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. ज्या ठिकाणी आम्हाला तक्रार प्राप्त झाल्या की आम्ही अर्जांची पडताळणी करू. पण सरसकट अर्जांची पडताळणी करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. तसेच लाडकी बहीण योजनेच्या निकषांत बदल करण्यात आलेला नाही.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत या महिलांना मिळणार 2100 रुपये यादी पाहा

 

 

Home

Leave a Comment